29 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्ररिक्षा व टॅक्सी वाहतुकीचे भाडेवाढ करून सर्वसामान्य प्रवाशांचे खिसे होणार रिकामे

रिक्षा व टॅक्सी वाहतुकीचे भाडेवाढ करून सर्वसामान्य प्रवाशांचे खिसे होणार रिकामे

टीम लय भारी

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महागाईने उच्छाद मांडला आहे. पेट्रोल, डिझेलच्या या वाढत्या दरांमुळे खाजगी वाहने सोडून प्रवासी आता वाहतुकीसाठी रिक्षा व टॅक्सीचा वापर करत आहे. पण आता पेट्रोल, डिझेलसोबतच सीएनजीचे (Petrol ) दर ही वाढत आहेत, त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना आता रिक्षा आणि टॅक्सीचे भाडे परवडतय की नाही असा प्रश्न निर्माण होणार आहे. त्याच बरोबर सर्व सामान्य नागरिकांना प्रमाणे रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर देखील आर्थिक संकट ओढावले आहे.(Petrol and diesel increase CNG prices)

याच पाश्वभूमीवर रिक्षा आणि टॅक्सी चालक संघखटनांनी परिवहन विभागाकडे कोणती मागणी  केली आहे. रिक्षाचे सध्याचे किमान भाडे २१ रुपये आहे. ते आता २ ते ३ रुपयांनी (Petrol and diesel increase CNG prices) वाढवण्याची मागणी संघटनांनी केली आहे. तर टॅक्सीचे सध्याचे भाडे २५ रुपये असून किमान पाच रुपये वाढ मिळावी अशी मागणी मुंबई टॅक्सीमेन्स युनिनने केली आहे. परिवहन विभागानंही यासाठी चाचपणी सुरु केलीय.

खटुआ समितीनुसार याची चाचपणी सुरु असून यासंदर्भात प्रत्येक आरटीओकडूनही माहिती मागवण्यात आली आहे. मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत यावर निर्णय होईल. काही रिक्षा संघटना जरी भाडेवाढ नको, (Petrol and diesel increase CNG pricese) असे म्हणत असल्या तरीही खटुआ समितीच्या नियमात बसत असल्यास ती वाढ द्यावीच लागेल. अशी माहिती परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

CNG price hiked by Rs 2.5 per kg in Delhi. Check rates

मुंबईची बेस्ट होणार आता १००% इलेक्ट्रिक: आदित्य ठाकरेंची घोषणा

रात्री IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या, सकाळी स्थगिती दिली

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी